मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधांचे जाळे; Vadhavan Port जवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ

36
मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधांचे जाळे; Vadhavan Port जवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ
मुंबई महानगर प्रदेशात पायाभूत सुविधांचे जाळे; Vadhavan Port जवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई (Mumbai) आणि महानगर परिसराची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० बिलियन डॉलरवरून सन २०३० पर्यंत ३०० बिलियन डॉलर तर सन २०४७ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Area) पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे उभारण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केलेल्या सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या निर्धाराचे प्रतिबिंब उमटले आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ (Vadhavan Port) मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहे.

( हेही वाचा : Chicken Biryani खाताना घसात अडकले कोंबडीचे हाड, घशातील हाड काढण्यासाठी मोजावे लागले ४ लाख रुपये

सात आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रे

मुंबई महानगर प्रदेश (Mumbai Metropolitan Area) हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच “ग्रोथ हब” म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वांद्रे-कुर्ला संकुल (Bandra Kurla Complex)
, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर आणि विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. (Vadhavan Port)

वाढवण बंदर २०३० मध्ये सुरु होणार

जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित कर‍ित आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च ७६ हजार २२० कोटी रुपये असून त्यात राज्य सरकारचा सहभाग २६ टक्के आहे. वाढवण बंदरामुळे सुमारे ३०० दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार आहे. जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणार आहे. सन २०३० पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षित आहे. या बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्‍या जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये होणार असल्याने महाराष्ट्र राज्य भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येईल. वाढवण बंदराजवळ (Vadhavan Port) मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित असून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही या बंदराजवळ असणार आहे. हे बंदर (Vadhavan Port) समृध्दी महामार्गालाही जोडण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

जेट्टीची कामे प्रगतीपथावर

मुरबे बंदर पालघर जिल्ह्यात मौजे मुरबे येथे बंदर (Vadhavan Port) निर्मितीच्या ४ हजार २५९ कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पाला खाजगी क्षेत्राच्या सहभागाने मंजुरी देण्यात आली आहे. प्रवासी जलवाहतूक गेटवे ऑफ इंडिया, मुंबई (Gateway Of India Mumbai) येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे. प्रवासी जेट्टी मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज जेट्टीचे २२९ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे काम सुरु आहे. दिघी- जिल्हा रायगड, वेंगुर्ला- जिल्हा सिंधुदुर्ग तसेच काल्हेर डोंबिवली, कोलशेत, मिरा-भाईंदर- जिल्हा ठाणे येथील जेट्टींची कामे प्रगतीपथावर आहेत. काशिद- जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु करण्यात येत आहेत, असे पवार म्हणाले.

नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी

नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे २५० एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत १० हजार महिलांना कौशल्य कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे अजितदादांनी सांगितले.

ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग

मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गत‍िमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन असून त्याव्दारे ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि अन्य महत्वाची मोठी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जातील. ठाणे किनारी मार्ग बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३. ४५ किलोमीटर असून त्याचे सुमारे ३ हजार ३६४ कोटी रुपये खर्चाचे काम सन २०२८ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिवडी-वरळी या १ हजार ५१ कोटी रुपये किंमतीच्या उन्नत जोडरस्त्याचे काम मार्च २०२६ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे १४ किलोमीटर लांबीचे १८ हजार १२० कोटी रुपये खर्चाचे काम मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. उत्तन ते विरार या सागरी सेतू आणि जोडरस्त्यांचा ५५ किलोमीटर लांबीचा ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

नवी मुंबई विमानतळावरून २०२५ मध्ये टेक ऑफ

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. नवी मुंबईतील उलवे येथे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि २. ६ दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. या प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत. तेथून एप्रिल २०२५ मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन असल्याचे अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले.

हायटेक कमांड कंट्रोल सेंटर

मुंबईतील गुन्हेगारीस प्रतिबंध, जलद आपत्कालीन प्रतिसाद आणि प्रभावी सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलीस आयुक्त, बुहन्मुंबई यांच्या कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत नवे “हायटेक कमांड कंट्रोल सेंटर” स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.