केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याची घोषणा केली. त्यामुळे केंद्राची ही घोषणा चांगलीच लक्ष आकर्षित करून गेली होती, अवघ्या जगाचाही या घोषणेकडे लक्ष गेले होते, कोरोनाची महामारी असतानाही इतके मोठे उद्दिष्ट कसे ठेवले म्हणून चर्चाही सुरु झाली आज तशीच चर्चा आता महाराष्ट्राची होणार आहे. करणार अर्थमंत्री अजित पवार यांनीही राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना चक्क डॉलरची भाषा केली आहे.
पंचसूत्री कार्यक्रम
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या नव्या तरतुदींमुळे देशभरात एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था असणारे महाराष्ट्र हे पहिलस राज्य ठरेल, असे पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता एक ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची चर्चा सुरू झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी विकासाच्या पंचसूत्रीवर सरकार काम करणार असल्याचे नमूद केले. यामध्ये कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव कामगिरी करून त्यांचा विकास साध्य करण्याचे धोरण राज्याने ठेवल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. ही पंचसूत्रीच यंदाच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण असल्याचे देखील अजित पवार यावेळी म्हणाले. याकरता ४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
(हेही वाचा Maharashtra budget 2022 : लता मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी १०० कोटींची तरतूद)
Join Our WhatsApp Community