केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यानंतर महाराष्ट्र इंधनावरील कर कमी करणार का अशी विचारणा केली जात होती, अखेर राज्य शासनाने इंधन स्वस्त करण्यासाठी अर्थसंकल्पातून पहिले प्रयत्न दिसले. त्यानुसार सीएनजीवरील कर कमी करण्यासची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात सीएनजी स्वस्थ होणार आहे.
सीएनजीवरील कर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के
राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या इंधनावरील करात कपात होईल अशी अपेक्षा सर्वसामान्यांनी व्यक्त केली होती. मात्र अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने घरगुती पाईप गॅस, सीएनजीवर चालणारी वाहने, याचा वापर वाढावा. पर्यावरणपूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी मूल्यवर्धित कराचा दर १३.५ टक्क्यांवरून ३ टक्के इतका केला आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे ८०० कोटी रुपयांची महसुली घट होणार आहे. यामुळे राज्यात CNG आणि PNG गॅस स्वस्त होणार आहे.
वसई, ठाणे, मुंबई, नवी मुंबई जोडणार
राज्यात जलवाहतुकीला चालना देण्यासाठी फेरी बोट, रो-रो महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून आकारण्यात येणाऱ्या करात ३ वर्षासाठी सूट देण्यात येईल. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी व गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्काशी दस्ताशी समायोजनेसाठी लागणाऱ्या कालावधीत १ वर्षाहून ३ वर्षापर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोने-चांदीचे दागिने बनवणारे छोटे मोठे उद्योग, रिफायनरी व निर्यातीस चालना देण्यासाठी महाराष्ट्रात आयात होणाऱ्या सोने-चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार आकारण्यात येणाऱ्या ०.१ टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. त्यामुळे राज्याला १०० कोटींच्या महसुलीची तूट येण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community