दोन दिवसांत प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल होणार! फडणवीसांनी काय केला गौप्यस्फोट?

121

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत, ८ – ८ तास बँकेत बसून ज्या पद्धतीने माहिती घेतली जात आहे, त्यावरून दरेकरांना टार्गेट केले जात आहे. पहिल्या प्रकरणात काही मिळाले नाही. दुसऱ्या प्रकरणात ओढून ताणून केले जात आहे. त्यांनी गुन्हा दाखल केला तर आम्ही न्यायालयात जाऊ, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गौप्यस्फोट केला.

फडणवीसांची एफबीआय  

देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली होती. आजही त्यांनी एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला. वक्फ बोर्डाच्या एका सदस्याचे दाऊदशी संबंध असल्याचे संभाषण असल्याचे पुरावे या पेन ड्राईव्हमध्ये आहेत. त्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावताना फडणवीस हे डिटेक्टिव्ह आहेत का असे म्हटले होते. पत्रकारांनी फडणवीस यांना नेमका हाच प्रश्न केल्याने फडणवीसांनी वळसे पाटलांना चिमटा काढला. मी एक एबीआय काढला आहे. फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असे त्याचे नाव आहे. अरे प्रकरणे बाहेर काढणे हे माझे कामच आहे. मी विरोधी पक्षनेता आहे. विरोधी पक्षाकडे शोषित पीडित लोक येत असतात. ते अशा गोष्टी आमच्याकडे आणून देतात. अजूनही काही गोष्टी येणार आहेत. त्या गोष्टी मला मांडाव्या लागतात, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा फडणवीसांच्या आरोपांचे प्रकरण सीआयडीकडे! गृहमंत्र्यांची घोषणा, विरोधकांचा सभात्याग)

गृहमंत्र्यांनी उत्तर देता आले नाही 

मी सरकारला पेन ड्राईव्ह दिला आहे. त्यातून गिरीश महाजन यांच्याकडे कशी रेड मारायची आणि त्यांना कसे अडकवायचे हे दिसून येते. हे प्रकरण सीबीआयला द्यायला हवे होते. पण त्यांनी दिले नाही. दिलीप वळसे पाटील हे मातब्बर आणि अनुभवी नेते आहेत. तेही आज बोलताना अडखळत होते. उत्तर चुकीचे देतोय हे त्यांना माहीत होते. पण या प्रकरणाची चौकशी सीबीआयला देत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. त्यासाठी न्यायालयात जाऊ. न्यायालयात गेल्यावर आणखी मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुदस्सीर लांबेंचे दाऊदशी संबंध 

वक्फ बोर्डाचे सदस्य मुदस्सीर लांबेंची क्लिप दिली आहे. या सरकारमध्ये ज्या लोकांची दाऊदसोबत जवळीक दाखवली जाते, त्यांना प्राधान्य आहे. अशा लोकांची अपॉईंटमेंट होते. निवडून आले ते सांगत आहे. पण त्याची पद्धत काय आहे पाहू. त्यांचा राष्ट्रवादीशी काय संबंध जगजाहीर आहे. दाऊदशी संबंधित लोकांबाबत त्यांचे विशेष प्रेम दिसत आहे, असा हल्लाबोलही फडणवीस यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.