पुण्यातील भिडे वाड्याच्या प्रश्नावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. येत्या १० तारखेला या प्रश्नावर पुन्हा सुनावणी असून हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी १० मार्चच्या आत भाडेकरूना रेडीरेकनर तसेच बाजारमुल्याप्रमाणे मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा असे आदेश पुणे महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
छगन भुजबळ यांनी भिडे वाड्यातील मुलींच्या शाळेबाबत सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘येत्या १० तारखेला या प्रश्नावर सुनावणी असून हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी १० मार्चच्या आत भाडेकरूना रेडीरेकनर तसेच बाजारमुल्याप्रमाणे मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा असे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही,’ असे आश्र्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलें त्याचा अहवाल कोर्टास सादर करून हा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.
(हेही वाचा – Maharashtra Budget Session 2023: विधानसभेत विरोधकांचा गोंधळ; फडणवीस संतापले अन् म्हणाले, ‘..तर हक्कभंग आणावा’)
Join Our WhatsApp Community