Maharashtra Budget Session 2023: विधानसभेत विरोधकांचा गोंधळ; फडणवीस संतापले अन् म्हणाले, ‘..तर हक्कभंग आणावा’

122

राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यभरात अवघ्या २ ते ३ रुपये किलोंवर कांद्याचे भाव आले आहेत. याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. राज्य सरकारने यावर तातडीने हस्तक्षेप करुन नाफेड सरख्या संस्थांना शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच केंद्र सरकारशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर मुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हे पाहताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले आणि विरोधकांना म्हणाले की, ‘तुमच्याकडे वेगळी माहिती तर तुम्ही हक्कभंग आणावा.’

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढायचा की राजकारण करायचे? – फडणवीस

अजित पवारांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते की, ‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत सरकार पूर्णपणे पाठिशी उभे आहे. नाफेडने खरेदी सुरू केलेली आहे.’ यादरम्यानच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले आणि म्हणाले की, ‘मुख्यमंत्री जेव्हा जबाबदारीने सांगतायत की, खरेदी सुरू झालेली आहे. सगळ्या प्रकारच्या कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केलेली आहे. आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचे आहे, हे एकदा ठरवले पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री सांगतायत की, कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केलेली आहे. तरीही यांच्याकडे वेगळी माहिती असेल तर यांनी हक्कभंग आणावा.’

(हेही वाचा – पक्ष कार्यालयाच्या मागणी संदर्भात लेखी पत्र लिहिण्यास का वाटतेय ठाकरे गटाला भीती?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.