Maharashtra Budget Session : देवेंद्र फडणवीस यांचे पहिले बजेट; पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्पाचे वाचन

139

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करत आहे. यंदा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा पहिला अर्थसंकल्प असून हा, यंदा पहिल्यांदाच आयपॅडमधून अर्थसंकल्पाचे वाचन केले जात आहे.

( हेही वाचा : Maharashtra Budget 2023-24 Live Update: शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!)

अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात 

तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अर्थसंकल्प मांडायला सुरूवात करतो. भारताच्या स्वातंत्र्यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला त्यांनी संविधानच नाही तर अर्थकारणावरही मार्गदर्शन केले त्यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे यंदा शताब्दी वर्ष आहे आणि माझे अर्थमंत्री म्हणून हे पहिलेच बजेट आहे असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरूवात केली. आयपॅडमधून या अर्थसंकल्पाचे वाचन केले जात आहे.

पंचामृत अर्थसंकल्प

  1. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी
  2. महिला, आदिवासी, ओबीसीसह सर्वसमावेशक विकास
  3. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
  4. रोजागरक्षम युवा
  5. पर्यावरणपुरक विकास
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.