ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यावरुन विधानसभेत आणि विधानपरिषदेत बुधवारी एकच गदारोळ उडाला. भाजप आणि शिवसेना आमदारांनी आक्रमक पावित्रा घेतला. तसेच दोन्ही सभागृहात राऊतांवर हक्कभंगाची कारवाईची जोरदार मागणी केली. आता राऊतांच्या या वक्तव्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. शिवाय शिवसेनेनेच आता राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा मागितला आहे.
राऊतांना तातडीने अटक करा
विधिमंडळाबाहेर शिवसेनेच्या वतीने बोलताना भरत गोगावले म्हणाले की, ‘जे वक्तव्य राऊतांनी केलेले आहे, ते संपूर्ण सभागृहाला आणि विधिमंडळाला केलेले आहे. आणि ते अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे. म्हणून सगळ्या सभागृहाने त्याची दखल घेऊन अध्यक्षांना विनंती केलेली आहे. परंतु आता आमची मागणी आहे, राऊतांना तातडीने अटक करावी आणि त्यांच्यावर जी काही कारवाई होईल ती कारवाई करावी.’
पुढे गोगावले म्हणाले की, ‘जर आम्ही चोर असलो, तर सभागृहात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार कोण? म्हणून आम्हाला पहिल्यांदा सिद्ध करायचे आहे की, चोर आम्ही आहे की संजय राऊत आहेत. सभागृहाचे प्रश्न, जनतेचे प्रश्न आम्ही उद्या मांडू. पण आम्हाला जर डाग लागला, तर तो आयुष्यभर पुसला जाणार नाही. म्हणून आमच्या सगळ्यांची मागणी आहे की, आमची मत घेऊन राऊत खासदार झालेत, त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि लढून दाखवावे.’
(हेही वाचा – संजय राऊतांच्या अटकेच्या मागणीसाठी गदारोळ; विधानसभा आणि विधानपरिषद दिवसभरासाठी तहकूब)
Join Our WhatsApp Community