Maharashtra Budget Session : ७५ हजार नोकरभरतीसह मराठा समाजासाठी विशेष योजना, राज्यपालांनी अभिभाषणात दिली माहिती

155

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणाद्वारे महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

( हेही वाचा : भाजपच्या हेमंत रासनेंविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!)

  • सीमा भागातील लोकांसाठी राज्य सरकारच्या विविध योजना
  • 75 हजार जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार असून राज्यात विविध क्षेत्रात भरती सुरू
  • जानेवारी 2023 मध्ये 1 लाख 35 हजारांच्या गुंतवणुकीचे करार
  • मराठा समाजासाठी राज्य सरकारच्या विशेष योजना
  • युवकांसाठी गडचिरोली, गोंदियामध्ये प्रशिक्षण केंद्र
  • पेन्शन योजनेतही राज्य सरकारकडून बदल
  • मैत्री योजनेतून अनेक सुविधा उपलब्ध होणार
  • सरकारने मेट्रोच्या अनेक नव्या योजना हाती घेतल्या आहेत
  • मुंबईकरांसाठी आपला दवाखाना योजना
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मेट्रो प्रकल्प
  • आर्थिक सल्लागार समितीची घोषणा
  • सी-लिंकचे काम तातडीने पूर्ण करणार
  • सरकारने स्वातंत्र्य सैनिकांची पेंशन 10 हजारांवरून 20 हजारांपर्यंत वाढवली
  • शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. हे अधिवेशन २५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. ९ मार्चला देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी एक दिवस म्हणजे ८ मार्च रोजी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येईल. यंदाचा अर्थसंकल्प ६ लाख कोटी रुपयांचा असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.