Maharashtra Budget Session : महसुली तूट २० हजार कोटींपेक्षा अधिक; सरकारच्या जमा खर्चाचा मेळ बसेना!

राजकोषीय तूट विक्रमी एक लाख कोटीपेक्षा अधिक

222
Maharashtra Budget Session : महसुली तूट २० हजार कोटींपेक्षा अधिक; सरकारच्या जमा खर्चाचा मेळ बसेना!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणा करण्याच्या नादात राज्य सरकारचे जमा खर्चाचे गणित पार कोलमडून गेले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर फेब्रुवारी महिन्यात राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना महसुली जमेपेक्षा खर्च वाढून तब्बल ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तूट अपेक्षित असल्याचे म्हटले होते. मात्र, अवघ्या चार महिन्यात पवार यांचे गणित कोलमडून पडले आहे. सन २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सरकारी तिजोरीवर ताण पाडणाऱ्या आकर्षक घोषणा केल्याने महसुली तूट आता २० हजार ५१ कोटी रुपयांपर्यंत पोहचणार असल्याचा अंदाज आहे. (Maharashtra Budget Session)

अजित पवार यांनी शुक्रवारी (२८ जून) विधानसभेत सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पाप्रमाणे या अर्थसंकल्पात जनतेसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. २०२४-२५ मध्ये एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तवित केली आहे. अंतरिम अर्थसंकल्पात ही तरतूद ६ लाख ५२२ कोटी रुपयांची होती. महसुली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये तर महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी रुपये प्रस्तावित केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पात राज्याची महसुली जमा ४ लाख ९८ हजार ७९८ कोटी रुपये असून महसुली खर्च ५ लाख ८हजार ४९२ कोटी रुपये दाखविण्यात आला होता. (Maharashtra Budget Session)

(हेही वाचा – पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी कारवाईला विलंब, Vijay Vadettiwar यांनी विधानसभेत केली ‘ही’ मागणी)

जिल्हा वार्षिक योजनेत २० टक्क्यांनी वाढ

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. हा नियतव्यय मागील वर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांनी अधिक असल्याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी आपल्या भाषणात केला. (Maharashtra Budget Session)

राज्य सरकारने पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सूट दिली आहे. आता उर्वरित केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि सशस्त्र सीमा दल यातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. या निर्णयाचा लाभ अंदाजे बारा हजार जवानांना होईल, असेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Budget Session)

नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याचे निष्पन्न झाल्यास, मुद्रांक शुल्काच्या फरकाच्या रक्कमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारी दंडाची रक्कम दरमहा २% वरुन १% करण्याची घोषणा पवार यांनी केली. तसेच मुद्रांक शुल्क परताव्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची कालमर्यादा मुद्रांक खरेदी केल्यापासून सहा महिन्यांऐवजी एक वर्ष करण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Budget Session)

प्रास्तवित निधी

राज्याची वार्षिक योजना….. १ लाख ९२ हजार कोटी रुपये
अनुसूचित जाती उपयोजना….. १५ हजार ८९३ कोटी रुपये
अनुसूचित जमाती उपयोजना……. १५ हजार ३६० कोटी रुपये
२०२३-२४ या वर्षासाठी कर महसुलाचा सुधारित अंदाज…. ३ लाख २६ हजार ३९७ कोटी रुपये
२०२४-२५ वर्षासाठी ३ लाख ४३ हजार ४० कोटी रुपये कर महसुलाचे उद्दिष्ट

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.