गेल्या अडीच वर्षांपासून कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली. त्यांचा सेवाभाव लक्षात घेऊन आरोग्य विभागातील भरतीच्या वेळी त्यांना ‘गुणांकन’ पद्धतीने लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.
(हेही वाचा – “… तर उदय सामंत यांना जाळून टाकू!” पोलिसांसमोरच ठार मारण्याची धमकी; रत्नागिरीत खळबळ)
वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. कोरोनाकाळात जीवावर उदार होऊन या कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीच्या वेळी या कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. अशी कार्यपद्धती लवकरात लवकर निश्चित करावी, जेणे करून भरतीच्या वेळी या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ व्हावा. तसेच सध्याच्या भरतीच्या पात्रतेच्या अधीन राहून ही कार्यपद्धती असावी, असेही यावेळी ठरविण्यात आले.
Join Our WhatsApp Community