धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा काढणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

99

धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवण्यासह अतिरिक्त सवलती देऊन या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

(हेही वाचा – घाटकोपरमध्ये भीषण अपघात, OLA चालकाची रिक्षा, टेम्पोसह दुचाकीला धडक, ८ जणांना उडवलं)

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा विशेष हेतू कंपनी मॉडेलच्या माध्यमातून (एसपीव्ही) एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला अतिरिक्त सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये रेल्वे जमीन विकास प्राधिकरणामार्फत रेल्वेच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा उल्लेख केलेल्या अटी व शर्ती देखील असतील.

या संदर्भात ५ नोव्हेंबर २०१८ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबतचा गृहनिर्माण विभागामार्फत काढण्यात आलेला १५ सप्टेंबर २०२२ चा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरचाच शासन निर्णय पुनर्जिवित करण्यात येईल.

रेल्वेच्या ४५ एकर जागेचा समावेश

कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती आणि एकूणच बाजारातील मंदीचा विचार करून निविदेच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करून रेल्वेच्या अंदाजे ४५ एकर जागेचा प्रकल्पात समावेश करण्याबाबत मान्यता देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.