
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री मंडळाची बैठक पार पडली. दरम्यान या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दांडी मारल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तसेच अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन टास्क फोर्स निर्मितीला मंजुरी दिली आहे. त्या शिवाय जळगाव, पुणे यासह इतर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (Maharashtra Cabinet Decision)
(हेही वाचा – Crime : कुर्ल्यात शाळेपासून जवळच्या अंतरावर मटका जुगाराचे अड्डे; पालकांनी केली कारवाईची मागणी)
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?
- म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
- अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)
- सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
- राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
- जळगांव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
- पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला (Dinanath Mangeshkar Hospital, Pune) नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग) (हेही वाचा – रणवीर अलाहाबादियाला Supreme Court ने झापलं; पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे दिले आदेश) हेही पाहा –