Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांची संपूर्ण यादी

65

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास 41 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहुर्त मिळाला. हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज, मंगळवारी 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये झाला. यावेळी एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे 9 तर भाजपकडून 9 जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

(हेही वाचा – संजय राठोडांनी शपथ घेताच चित्रा वाघ यांनी केलं पहिलं ट्वीट; म्हणाल्या हे अत्यंत दुदैवी …)

या क्रमाने झाले 18 आमदार शपथबद्ध

भाजपकडून पहिली शपथ राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.

शिवसेना

१) गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण, कॅबिनेट
२) दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक), कॅबिनेट
३) संजय राठोड – यवतमाळ दिग्रस, कॅबिनेट
४) संदिपान भुमरे – पैठण (संभाजीनगर), कॅबिनेट
५) उदय सामंत – रत्नागिरी, कॅबिनेट
६) तानाजी सावंत – पलांडा (उस्मानाबाद), कॅबिनेट
७) अब्दुल सत्तार – सिल्लोड (संभाजीनगर), कॅबिनेट
८) दीपक केसरकर – सावंतवाडी (सिंधुदुर्ग), कॅबिनेट
९) शंभूराजे देसाई – पाटण (सातारा), कॅबिनेट

भाजप

१) राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी (अहमदनगर), कॅबिनेट
२) सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर (चंद्रपूर), कॅबिनेट
३) चंद्रकांत पाटील – कोथरूड (पुणे), कॅबिनेट
४) डॉ. विजयकुमार गवित – नंदुरबार , कॅबिनेट
५) गिरीश महाजन – जामनेर (जळगाव), कॅबिनेट
६) सुरेश खाडे – मिरज (सांगली), कॅबिनेट
७) रवींद्र चव्हाण – डोंबिवली, कॅबिनेट
८) अतुल सावे – संभाजीनगर पूर्व, कॅबिनेट
९) मंगलप्रभात लोढा – मलबार हिल, कॅबिनेट

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.