मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांचे या भेटीकडे लक्ष्य लागले आहे.
19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार करावा असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा 19 जून आधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्यातील राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारवर टीका देखील झाली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही नवोदित आमदार देखील मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(हेही वाचा Aurangzeb : एमआयएमचे पुन्हा उफाळून आले औरंग्यावरील प्रेम; शहराध्यक्ष फोटो घेऊन नाचला )
नवीन आमदारांना मंत्री पदाची संधी देण्यासाठी सध्याच्या मंत्रिमंडळातील काही आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता देखील आहे. काही मंत्रिमंडळातील चेहरे फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. अशातच आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर लगेच विधानसभा निवडणुका असल्याने अशा चेहऱ्यांना मंत्रिमंडळातून बाजूला सारून त्या जागी नवीन आमदारांना संधी दिली जाऊ शकते.
Join Our WhatsApp Community