हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडील खात्यांची जबाबदारी मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांकडे दिली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
(हेही वाचा – ‘त्या’ दिवशी फडणवीसांच्या ड्रायव्हिंगला मुख्यमंत्री घाबरले! मोदींकडूनही झाली चौकशी; म्हणाले…)
सध्या राज्यातील मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह २० मंत्री आहेत. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अतिरिक्त खात्यांचा कारभार आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांचा कार्यभार आपल्या पक्षातील मंत्र्यांकडे सोपवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपल्याकडील खाती भाजपच्या मंत्र्यांकडे दिलेली नाहीत.
कोणाकडे कुठले अतिरिक्त खाते?
– उद्योग मंत्री उदय सामंत : माहिती तंत्रज्ञान
– राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई : राज्य रस्ते विकास महामंडळ
– अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड – विशेष सहाय्य विभाग
– आरोग्यमंत्री तानाजी सावंत : जलसंधारण विभाग
– कृषिमंत्री अब्दुल सत्तार : अल्पसंख्याक विभाग
– शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर : पर्यावरण खाते
– रोहयो मंत्री संदिपान भुमरे : मदत व पुनर्वसन खाते
– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील : माहिती व जनसंपर्क विभाग