मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा रविवारी नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार, याविषयी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची तयारी करण्यात आली आहे. रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडेल, असे राजभवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. २० ते २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता आहे.
(हेही वाचा – MADARSAS Rail Jihad : रेल्वेगाड्या रुळांवरून घसरवण्यामागे मदरशांचा हात ?; अन्वेषण यंत्रणांना संशय)
कोणाची लागणार वर्णी ?
भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांचा सामावेश केला जाणार नाही. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे समजते. भाजपाच्या यादीबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून नावे अंतिम करणार आहेत. मंत्रीमंडळात आपला समावेश व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे इच्छुक जमले होते.
भाजपकडून 19 आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री आणि आज शपथ घेणारे 19 लोक असे 20 मंत्री राहतील. अजित पवार यांचे आज 9 मंत्री शपथ घेतील, तर एकनाथ शिंदे यांचे 11 मंत्री आज शपथ घेतील. काही जुन्या मंत्र्यांना वगळून त्यांच्या ऐवजी नव्या दमाच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जात असल्याची माहिती आहे. भाजपचे 20 शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 असे 42 मंत्री आता मंत्रीमंडळात रहातील, तर 1 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community