शहाजी पाटलांना मिळणार मंत्रिपद? बापू स्वतः म्हणाले, ‘आमचं गुवाहाटीतच ठरलंय की…’

88

शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास 41 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहुर्त मिळाला आहे. आज, मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवन येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी 18 मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून, शिंदे गटातील 7 तर, भाजपकडून 11 जणांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.

(हेही वाचा – आमदारांना फोन गेले, पण मंत्रिमंडळ समावेशाबाबत निरोप नाहीच!)

या शपथविधी सोहळ्याला शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघातून मुंबईत दाखल झाले आहेत. यासह संभाव्य मंत्री देखील मुंबईत हजर झाले आहेत, सोबत अनेक आमदार देखील आहेत. दरम्यान, नॉट रिचेबल झालेले आणि गुवाहाटीमध्ये असताना काय झाडी काय डोंगार काय हाटेल या डायलॉगनंतर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे देखील शपथविधी कार्यक्रमासाठी हजर झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शहाजी बापू

मंत्रिमंडळात जुन्या नेत्यांना संधी दिली जात आहे हे योग्य आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. हे आमचं गुवाहाटीतच ठरलेलं आहे आणि 50 आमदार हे मनापासून मान्य करतील. मी आजिबात नाराज नाही. जो निर्णय होईल तो आनंदाने मान्य असणार आहे. जुन्याला सोडून आम्हाला संधी कशाला. मला फार मोठी अपेक्षा नाही, असेही शहाजी पाटील म्हणाले.

शपथविधीसाठी शिंदे गटाकडून ही नावे निश्चित

उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, शंभूराज देसाई आदींना मंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर, भाजपकडून 11 जण शपथ घेणार आहेत यामध्ये चंद्रकांत पाटील, राधा कृष्ण विखे पाटील, सुधीर मुनंगटीवार, गिरिष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित इत्यादी 9 नावं निश्चित झाली आहेत. उर्वरित 2 नावांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.