महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून २१ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. तर, शिवसेनेच्या १२ आमदारांना मंत्रीपदासाठी फोन करण्यात आल्याची माहिती भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दिली आहे. (Maharashtra Cabinet Expansion)
हेही वाचा-Maharashtra Cabinet : मंत्रीमंडळ विस्ताराची नागपुरात तयारी; कोणाची लागणार मंत्रीपदी वर्णी
संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, दादा भुसे, उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेख आमदार भरत गोगावले यांनी केला. कदाचित संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळू शकतं असं गोगावले यांनी म्हटलं. १२ आमदारांना फोन गेल्याची माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे. (Maharashtra Cabinet Expansion)
मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री (Maharashtra Cabinet Expansion)
मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या (Nagpur) राजभवनात दुपारी तीननंतर हा शपथविधी होणार असून राजभवनाच्या प्रशस्त लॉनवर याची जोरदार तयारी करण्यात आलीय. याआधी 1991 मध्ये शिवसेनेतल्या फुटीनंतर नागपुरात शपथविधी झाला होता .यानंतर 33 वर्षांनंतर मंत्रिमंडळाचा शपथविधी हा नागपुरात होणार आहे. (Maharashtra Cabinet Expansion)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community