Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? बच्चू कडूंनी सांगितली तारीख

मला एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते, असे कडू म्हणाले.

217

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी थेट मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखच सांगून टाकली आहे. येत्या 20 ते 21 मे दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे आमदार कडू म्हणाले.

आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्री कराल न कराल तो नंतरचा भाग आहे. कारण एका मंत्राकडे चार ते पाच खात्यांचा पदभार आहे. त्यामुळे गोंधळलेली अवस्था आहे. म्हणून लोकांची कामे लवकर होण्यासाठी आता विनाविलंब मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे. तसेच मला एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के आहेत. ते शब्द पाळणार आहेत. विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांना अपात्र ठरवणार नाहीत. एकनाथ शिंदे यांनी कागदोपत्री यशस्वी लढा जिंकला आहे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आता 20 ते 21 मे दरम्यान होईल, असे कडू म्हणाले.

(हेही वाचा Maharashtra Political Crisis : …तर उद्धव ठाकरेंच्या हाती राहिली असती शिवसेना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.