Maharashtra Cabinet Meeting: आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांना मिळणार १० लाखांची मदत; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

179
Maharashtra Politics : महाराष्ट्रात बदलणार खातेवाटपाचा फॉर्म्युला!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत ४८.२१ लाख कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना इकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (Maharashtra Cabinet Meeting)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत सरकारच्या वतीनं सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या जालना जिल्ह्यातील अंबडला एमआयडीसी स्थापन करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. (Maharashtra Cabinet Meeting)

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (Maharashtra Cabinet Meeting)

  • राजे यशवंतराव होळकर महामेष” योजना पुढे सुरू ठेवणार. मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करणार (पशुसंवर्धन विभाग)
  • आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान. अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख. अपंगत्वासाठी पाच लाख (सार्वजनिक आरोग्य)
  • शेतीपिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करणार (मदत व पुनर्वसन विभाग)
  • दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीसाठी आरक्षण धोरण ( सामान्य प्रशासन)
  • बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी 51 सदनिका भाडे तत्वावर ( सामान्य प्रशासन)
  • अंबड तालुक्यात एमआयडीसीसाठी 16 हेक्टर शासकीय जमीन ( महसूल विभाग)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.