Cabinet Portfolio : राज्याचे मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोणती जबाबदारी?

191

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित खाते वाटप (Cabinet Portfolio) कधी होणार, यावर सर्वांचे लक्ष होते. अखेर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाते वाटप रात्री होईल से सांगितले होते. त्यानुसार खातेवाटप (Cabinet Portfolio) झाले असून गृहखाते मुख्यमंत्री यांनी स्वतःकडे ठेवले आहे, तर अर्थखाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे. (Cabinet Portfolio)

कुणाला कोणते खाते? 

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय आणि विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क खाते.
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  • उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
  • चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
  • राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
  • हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
  • चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
  • गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
  • गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
  • गणेश नाईक – वन
  • दादाजी भुसे – शालेय शिक्षण
  • संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
  • धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
  • मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
  • उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
  • जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
  • पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
  • अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरन
  • अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
  • शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
  • आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
  • दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
  • अदिती तटकरे – महिला व बालविकास
  • शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
  • माणिकराव कोकाटे – कृषी
  • जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
  • नरहरी झिरवाळ – अन्न आणि औषध प्रशासन
  • संजय सावकारे – टेक्सटाइल
  • संजय शिरसाट – सामाजिक न्याय
  • प्रताप सरनाईक – परिवहन
  • भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन, खार जमीन विकास
  • मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
  • नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
  • अशोक फुंडकर – कामगार
  • बाबासाहेब पाटील – सहकार
  • प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

(हेही वाचा Sanjay Raut Home Reiki : संजय राऊतांचा नुसताच कांगावा; निवासस्थानी रेकी करण्यासाठी नव्हे तर जिओ नेटवर्क टेस्ट ड्राईव्हसाठी आलेले)

राज्यमंत्री

  • माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
  • आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
  • मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
  • इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
  • योगेश कदम – ग्रामविकास, पंचायत राज
  • पंकज भोयर – गृहनिर्माण

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.