मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार (Maharashtra Cabinet) रविवारी (१५ डिसेंबर) पार पडला. विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे एकूण ३९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू देत ३९ जणांपैकी २० नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. (Maharashtra Cabinet)
हेही वाचा-One Nation One Election विधेयक लोकसभेत स्थगित; राज्यसभेत होणार दोन दिवस विशेष चर्चा
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यातील १९ जिल्ह्यांमधील किमान एका तरी आमदारांना मंत्रिपद मिळालं आहे. तर १७ जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळालेलं नाही. एकट्या सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. तर, विदर्भातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांचा मंत्रिमंडळात प्रतिनिधी नाही. (Maharashtra Cabinet)
‘या’ १९ जिल्ह्यांना मंत्रिपदं मिळाली (Maharashtra Cabinet Expansion)
अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, जळगाव, ठाणे, नाशिक, यवतमाळ, बीड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, धुळे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, बुलढाणा, लातूर, नागपूर. (Maharashtra Cabinet)
‘हे’ १७ जिल्हे वंचित
नंदुरबार, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, पालघर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली. (Maharashtra Cabinet)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community