अडीच महिन्यांनंतर अखेर मुख्यमंत्र्यांचे होणार प्रत्यक्ष दर्शन!

124

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर, ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विरोधकांकडून टीकेचे धनी व्हावे लागले. आता मुख्यमंत्री अडीच महिन्यानंतर प्रत्यक्ष सभेला हजर राहणार आहेत. बुधवारी छत्रपती शिवाजी मैदानावर होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  हजेरी लावणार आहेत.

प्रत्यक्ष कार्यक्रमाला हजर राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी स्पाइन सर्जरी करण्यात आली होती. सर्जरीनंतर ते आतापर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका, कार्यक्रमांना उपस्थित राहत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना 2 डिसेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुन्हा सक्रिय होत असल्याचे, दिसून येत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले होते.

( हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात, कोण सचिन वाझे?)

महापालिकेची तयारी सुरु

बुधवारी होणा-या  प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी पार्कवर मुंबई महापालिकेकडून तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता, महापालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत अधिवेशन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता यंदाचे विधीमंडळ अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहतील असे म्हटले जात होते. मात्र, हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.