Swatantryaveer Savarkar यांच्या प्रतिमेबाबत काँग्रेस सरकारने घेतलेल्या भूमिकेचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध

66
Swatantryaveer Savarkar यांच्या प्रतिमेबाबत काँग्रेस सरकारने घेतलेल्या भूमिकेचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध
  • खास प्रतिनिधी 

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांची प्रतिमा विधानसभा सभागृहातून काढून टाकण्याच्या निर्णयाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईत पार पडले. सोमवारी ९ डिसेंबर २०२४ या दिवशी विधान परिषद सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील सर्व मराठी भाषिकांच्या वतीने कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा निषेध व्यक्त केला.

(हेही वाचा – Crime : पत्नीच्या हत्येनंतर चार राज्ये फिरून चेन्नई येथे स्थायिक होण्यासाठी गेलेल्या पतीला अटक)

तूजसाठी मरण ते जनन..

फडणवीस विधान परिषदेत म्हणाले, “तूजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’ असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचा मानबिंदू आहेत. भारतमातेसाठी दोन वेळा काळ्यापाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) एकमेव आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेची सेवा केली. अशा स्वातंत्र्यवीरांचे चित्र काँग्रेसच्या नेत्यांनी कर्नाटक विधानसभेतून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह देशातील सर्व मराठीभाषिक याचा आम्ही निषेध करतो,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांची कर्नाटक विधानसभेतील प्रतिमा काढणार असल्याचे वक्तव्य केले, हे गंभीर असून या घटनेचा राज्य शासन निषेध करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

(हेही वाचा – Bangladesh मधील हिंदूंवरील हल्ले थांबवण्यासाठी मुंबईत सकल हिंदू समाजाकडून निदर्शने)

मराठी भाषिकांच्या पाठीशी

विरोधी परिषद पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार अत्याचार करत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी वरील उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, कर्नाटक सरकारकडून बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर सुरु असलेल्या अन्यायाचा आम्ही निषेध करतो. मराठी माणसांनी मेळावे घेऊ नयेत, अशी कर्नाटक सरकारने घेतलेली भूमिका घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे. तसेच तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होत नाही तोवर आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (Swatantryaveer Savarkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.