मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. नुकतीच एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या नवीन पदांसाठी नियुक्ती जाहीर केली आहे. सचिव पदे आणि प्रवक्ते पदांसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून यावरुन आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या नेत्यांच्या हाती नियुक्तीपत्रे
कामगार नेते व माजी आमदार किरण पावसकर आणि ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील,उदय सामंत, गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी नियुक्ती झाल्याची नियुक्तीपत्रे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किरण पावसकर आणि संजय मोरे यांना देण्यात आली आहेत.
(हेही वाचाः औरंगाबाद की संभाजीनगर? नामांतरणाची लढाई आता न्यायालयात होणार)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील उर्वरित नेत्यांना देखील लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. पक्ष विस्तारासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या असून, यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community