फडणवीस म्हणाले, ‘तुमच्या इतकं काम मी नाही करू शकत!’ सभागृहात शिंदेंनी स्पष्टच सांगितले

159

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारकडून आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक देखील केले आहे.

फडणवीसांचा मोठेपणा

मी मुख्यमंत्री म्हणून मी काम करत असताना कोणीही मला भेटू शकतं. त्यासाठी माझी वेळ घेण्याची गरज नाही. माझ्या आधी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते देखील खूप काम करायचे. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत ते लोकांना भेटायचे, त्यांच्या कामाचा आवाका पाहून मलाही आश्चर्य वाटायचं. पण तरीसुद्धा तुमच्या इतकं काम मी करू शकत नाही,असे ते मला नेहमी म्हणायचे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

(हेही वाचाः ‘दादा, अंबादास बसले आणि काँग्रेसवाले हात चोळत राहिले!’, मुख्यमंत्र्यांनी कवितेतून मविआला झोडले)

राज्याच्या विकासासाठी काम करूया

देवेंद्र फडणवीसांकडे पाच वर्ष राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा राज्याच्या विकासासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे आम्ही दोघं, आपलं मंत्रिमंडळ आणि आपण सगळेच एकमेकांच्या हातात हात घालून राज्याच्या विकासासाठी काम करण्याची अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.