‘दादा, अंबादास बसले आणि काँग्रेसवाले हात चोळत राहिले!’, मुख्यमंत्र्यांनी कवितेतून मविआला झोडले

165

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरदार बॅटिंग केली आहे. विधानसभेत भाषण करताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते पदावरुन मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे.

विधानसभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसला संधी न देण्यात आल्यामुळे काँग्रेसमधील नाराजी उघड झाली होती. आता त्यावरुनच मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसला काव्यात्मक चिमटे काढले आहेत.

(हेही वाचाः राज ठाकरे यांना पोलिसांची नोटीस, ‘त्या’ सभेप्रकरणी आरोपपत्र दाखल)

काँग्रेसवर निशाणा

महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला कायमंच डावलण्यात येत होते. त्याबाबत बाळासाहेब थोरात नेहमी माझ्याकडे तक्रार करत होते. आता विरोधी पक्षात असतानाही काँग्रेसची अवस्था वाईट आहे. महाविकास आघाडीची पुरती गेली रया… दादा, अंबादास बसले आणि काँग्रेसवाले हात चोळत बसले. विरोधी पक्षनेते पद देताना काँग्रेसला विचारण्यात देखील आले नाही. त्यावरुन काँग्रेसने जाहीर नाराजी देखील व्यक्त केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काव्यात्मक चिमटे

इंदिरा गांधींच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेबरोबर आता नुसती झाली फरफट, अशी काव्यात्मक टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यांच्या या कवितांमुळे सभागृहात एकच हशा पिकला, तेव्हा थोडे आठवले सुद्धा आहेत अशी मिश्कील टिप्पणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.