आज बाळासाहेब असते तर खूश झाले असते, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

77

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर आता खरी शिवसेना कोणाची असा एक नवा वाद सुरू झाला आहे. स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून शिंदे गटाला आव्हान देण्यात येत आहे. निवडणुका लढवा आणि जिंकून दाखवा असं ठाकरे कुटुंबीयांकडून शिंदे गटाला आव्हान दिले जात असतानाच, इंडिया टिव्हीच्या एका सर्व्हेमधून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी इंडिया टिव्हीला प्रतिक्रिया दिली आहे.

मूड ऑफ नेशन्स या सर्व्हेनुसार, जर आता देशात लोकसभा निवडणुका लागल्या तर राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी भाजपला 26, शिंदे गटाला 11, शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 6 आणि काँग्रेसला 2 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. याबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रेय असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचाः लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यात भाजप-शिंदे गट जिंकणार? काय सांगतो सर्व्हे)

बाळासाहेबांचे स्वप्न

मोदी विकासकामाला गती देत आहेत. काश्मीर भारताच्या नकाशावरुन हद्दपार होईल अशी शंका व्यक्त करण्यात येत असतानाच मोदी सरकारने 370 कलम हटवले आणि काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देखील हे स्वप्न होते. आज जर बाळासाहेब असते तर खूप खूश झाले असते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

जनतेच्या हितासाठी काम करणार

आमच्या नव्या सरकारला राज्यात एक महिना पूर्ण होत आहे. हे प्रेम लोकांचे आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचे अनेक निर्णय आम्ही घेतले असून यापुढेही ते घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करत आम्ही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे, नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना देखील 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचाः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले जानव्याचे महत्व सरकारी पुस्तकातून वगळले)

आम्ही बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेत असल्यामुळे आम्हाला जनतेचा चांगला पाठिंबा मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.