१११ साधूंचा शंखनाद, चांदीचे धनुष्य… शिंदे गटाकडून ‘करेक्ट कार्यक्रम’

104

दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत चढाओढ सुरू असताना, शिंदे गटाने ठाकरेंच्या एक पाऊल पुढे टाकत हिंदुत्त्वाचा अजेंडा ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या व्यासपीठावर साधू-महंतांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना स्थान देण्याचे नियोजन केले आहे. शिंदेंच्या मेळाव्यात १११ साधू शंखनाद करणार असून, मुख्यमंत्र्यांना चांदीचे धनुष्य भेट दिले जाणार आहे.

(हेही वाचा – मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही! उद्धव गटाच्या मेळाव्यावरील बॅनर)

शिवसेनेतील फुटीनंतर पहिलाच दसरा मेळावा पार पडत आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. सर्वाधिक शिवसैनिक कोणाच्या बाजूने, हे दाखविण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. मेळावा सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक राहीले असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा समोर येत आहे.

त्यानुसार, सायंकाळी ५.३० वाजता नंदेश उमप यांचे सांगितीक कार्यक्रम, ६.३० वाजल्यापासून शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची आणि नेत्यांची भाषणे सुरू होतील.  साधारणतः ७.२५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर दाखल होतील. यावेळी १११ साधूंकडून शंखनाद केला जाणार आहे. शिंदेंची इन्ट्री एकदम हटके असावी, यादिशेने नियोजन सुरू असल्याचे कळते.

अयोध्येतील साधूंना निमंत्रण

अयोध्येतून आलेल्या साधू-महंतांना शिंदे गटाच्या दसरा मेळ्याव्यात विशेष स्थान देण्यात आले आहे. शंखनाद केल्यानंतर हे साधून मुख्यमंत्री शिंदे यांना चांदीचे धनुष्य आणि गदा भेट देतील. त्यानंतर ४० आमदार १२ खासदार शिंदे यांचा सत्कार करतील. रात्री ८.१५ च्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होईल. साधारणतः १ तास त्यांचे भाषण चालेले, असे कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.