मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदारांवर कारवाी करण्याच्या याचिकेवर सोमवार 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. हे प्रकरण सुनावणीसाठी घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय घटनापीठाने दिला आहे. त्यामुळे शिंदे सरकारसाठी हा मोठा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे. या निकालानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे.
जीवनातील प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस असे म्हणत शिंदे यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
(हेही वाचाः तर निकाल येईपर्यंत शिंदे मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील, घटनातज्ज्ञांचे मत)
एकनाथ शिंदे यांचे ट्वीट
11 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचा वाढदिवस आहे. याच दिवशी एकनाथ शिंदे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे हा दिवस शिंदे यांच्यासाठी खास असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तु खंबीरपणे उभी राहिलीस,सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास.तुझ्यासारखी सुजाण,सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो.लता,वाढदिवसाच्या शुभेच्छा. pic.twitter.com/nuIKfrt845
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 11, 2022
‘जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस,सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास.तुझ्यासारखी सुजाण,सूज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो.लता,वाढदिवसाच्या शुभेच्छा.’, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
(हेही वाचाः संकटकाळात साथ दिलीत, तुमच्यामुळे बळ मिळाले; उद्धव ठाकरेंचे आमदारांना भावनिक पत्र)
Join Our WhatsApp Community