सध्या राज्यात आणि देशात विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते यात्रा काढत आहेत. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. याआधी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा झाली, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचा झेंडा हातात घेऊन राज्यभरात ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’ सुरु करणार आहेत. २० ते ३० सप्टेंबर २०२२ या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे राज्यभर ही यात्रा करणार आहेत.
जनतेची अपेक्षा जाणून घेणार
एकनाथ शिंदे गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन मुख्यमंत्री राज्य पिंजून काढणार आहेत. यामध्ये प्रत्येक आमदारावर प्रत्येक मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते मतदार संघात फिरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत काय वातावरण आहे, हे पाहतील. तो तो आमदार जिल्ह्यात जाईल, कार्यकर्त्यांची बैठक घेतील आणि धोरण ठरवतील. राज्यातील जनतेची या सरकारकडून काय अपेक्षा आहे, याचा लेखाजोखा एकत्र करतील. तसेच हिंदुत्वासाठी आम्ही कसे एकत्र आलो आहोत आणि एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचा कसा चेहरा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशी यात्रा सुरु केली होती.
Join Our WhatsApp Community