केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC च्या माध्यमातून देशातील प्रशासकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात येते. राज्यातील अनेक मराठी होतकरू तरुण-तरुणी सुद्धा ही परीक्षा देऊन भावी अधिकारी व्हायची स्वप्न पाहत असतात. त्यासाठी हे उमेदवार अनेकदा दिल्लीत जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. अशा उमेदवारांना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दिलासा आहे.
स्वतंत्र इमारत बांधणार
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असणा-या काही खोल्या तसेच शासनाच्या अखत्यारित असणा-या जागेत 500 खोल्यांची स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे. दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.
विद्यार्थ्यांना दिलासा
दिल्लीसारख्या ठिकाणी राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणे हे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी फारच आव्हानात्मक असते. अशा विद्यार्थ्यांना दिल्लीत राहण्यासाठी करावा लागणारा जागेचा खर्च देखील अमाप असतो. त्यामुळे अनेकदा दिल्लीत राहून स्पर्धा परीक्षा देणा-या तरुणांचे नुकसान होते व ते आपलं अधिकारी होण्याचं स्वप्न अर्धवट ठेऊन राज्यात परततात.
(हेही वाचाः सरकारी कर्मचा-यांचं होणार प्रमोशन, पगारात होणार भरघोस वाढ! सरकारची मोठी घोषणा)
पण अशा हुशार आणि होतकरू तरुणांची देशाला गरज असल्याने त्यांना दिल्लीत हक्काचा निवारा मिळाला तर ते प्रशासकीय सेवेसाठी प्रयत्न करतील, तसेच आर्थिक बोजा कमी झाल्यामुळे सर्वसामान्य पालक देखील आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देतील. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे म्हटले जात आहे.
Join Our WhatsApp Community