Maharashtra CM Face : उद्धव ठाकरेंच्या चेहेऱ्याला शरद पवारांचा विरोध?

182
Maharashtra CM Face : उद्धव ठाकरेंच्या चेहेऱ्याला शरद पवारांचा विरोध?

विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे हाच मुख्यमंत्री पदाचा चेहेरा असावा, यासाठी उबाठाने काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी काँग्रेसने अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही. मात्र शरद पवार यांच्याकडून ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Maharashtra CM Face)

चेहेरा हा व्यक्तिचा नसून महाविकास आघाडीचा

उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी, मुलगा आदित्य यांच्यासह गेले तीन दिवस दिल्ली दरबारी ठाण मांडून बसले आहेत. महाविकस आघाडी हाच निवडणुकीतील चेहेरा असेल, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाण्यास अप्रत्यक्ष विरोध दर्शवला आहे. तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहेरा हा व्यक्तिचा नसून महाविकास आघाडीचा असेल, असेही स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Hockey Olympic 2024: भारत देशाला चौथं पदक मिळालं; भारतीय हॉकी संघाची कांस्य पदकाला गवसणी)

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतात

तरीदेखील वेळोवेळी शिवसेना ऊबाठा प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत, असे सूचित करण्यात येत असते. ठाकरे यांची राज्याचे पुन्हा एकदा नेतृत्व करावे, अशी इच्छा असली तरी काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्यासारखे इच्छुक आहेतच. किंबहुना, राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास पवार कन्या सुप्रिया सुळे यांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Maharashtra CM Face)

शरद पवार यांचा विरोध का?

ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाला शरद पवार विरोध करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. याचे कारण धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि उद्योगपती गौतम अडाणी यात दडले आहे. शरद पवार आणि अडाणी यांचे सलोख्याचे संबंध असल्याचे जगजाहीर आहे तर उद्धव ठाकरे हे अडाणी यांच्या विरोधात असल्याचे सर्वश्रुत आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा अडाणी यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न ठाकरे यांच्याकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(हेही वाचा – रस्ते दुरुस्तीच्या कामात हयगय नको; CM Eknath Shinde यांची अधिकाऱ्यांना तंबी)

अडाणी म्हणजे ‘गले की हड्डी’

त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्पाला ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला आणि पवार यांच्याकडून ठाकरे-अडाणी संबंध सुधारण्यात यश आले, तर काँग्रेस आणि अडाणी हा नवा मुद्दा ठाकरे यांच्यासमोर उभा राहू शकतो. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अडाणी यांच्या विरोधात लोकसभेत मोदी सरकारला घेरण्यासाठी आवाज उठवला होता. त्यामुळे ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्री पद ही ‘गले की हड्डी’च बनण्याची शक्यता अधिक आहे. (Maharashtra CM Face)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.