Maharashtra CM : महायुतीच्या नेत्यांची रात्री उशिरापर्यंत दिल्लीत बैठक; अखेर कोण होणार मुख्यमंत्री ?

78
Maharashtra CM : महायुतीच्या नेत्यांची रात्री उशिरापर्यंत दिल्लीत बैठक; अखेर कोण होणार मुख्यमंत्री ?
Maharashtra CM : महायुतीच्या नेत्यांची रात्री उशिरापर्यंत दिल्लीत बैठक; अखेर कोण होणार मुख्यमंत्री ?

महाराष्ट्रातील महायुती सरकारचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्यासाठी दिल्लीत महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली. (Maharashtra CM) गुरुवार, २८ नोव्हेंबरच्या रात्री या बैठकीला शाह यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार (Ajit Pawar), प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते. या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी सुमारे अडीच तास चर्चा केली. रात्री साडेनऊ वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री १२ वाजता संपली. या बैठकीत कोणाला किती व कोणती मंत्रिपदे मिळणार, यावर चर्चा झाल्याचे कळते. महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी २ डिसेंबरला होईल, असे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – Sexual Assault : मदरशात मौलवीचा दहा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, दोन आरोपी फरार)

फडणवीस-अजित पवार यांच्यात चर्चा

त्यापूर्वी फडणवीस आणि अजित पवार यांनी पवार यांच्या निवासस्थानी दीड तास चर्चा केली. शाह यांच्यासमोर मांडावयाच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील अजित पवार गटाच्या आमदारांना मंत्रिपदाची जास्त संधी दिली जाईल, असे समजते.

 शिंदेंची नड्डा यांची शाह यांच्याशी स्वतंत्र चर्चा

देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकीकडे बैठक सुरु असताना रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळाहून थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दाखल झाले होते. नड्डा आणि शाह यांच्यात बैठक सुरु होती. या दरम्यान एकनाथ शिंदे तिथे पोहोचले. यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Maharashtra CM)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.