देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज (५ डिसेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ (Maharashtra CM Oath Ceremony) घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल. तर आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेतील, अशी माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (Maharashtra CM Oath Ceremony)
भव्य शपथविधीसाठी कोणा-कोणाला आमंत्रण?
या शपथविधीसाठी एनडीएशासित राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण करण्यात आलं आहे. या शपथविधीच्या या ग्रँड सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी साधू-महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. महायुतीच्या आजच्या शपथविधी सोहळ्याला 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह महत्वाचे केंद्रातील पाच मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. (Maharashtra CM Oath Ceremony)
पंतप्रधान मोदी किती वाजता मुंबईत येणार?
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान मुंबई विमानतळावर दाखल होतील. यानंतर ते 5.15 च्या सुमारास आझाद मैदानात पोहोचतील. यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल. त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील. हे शपथविधी झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी रवाना होतील. (Maharashtra CM Oath Ceremony)
अमित शाहांसोबत बैठक
तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील मुंबईत येणार आहेत. अमित शाह हे दुपारी 3.30 वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्यापूर्वी अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहात एक छोटी बैठक घेतली. दुपारी ३.३० नंतर ही बैठक होईल. अमित शहा जवळपास 2 तास सहयाद्री अतिथीगृहात असतील. त्या दरम्यान ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक करतील. त्यामुळे शपथविधीपूर्वी तिन्ही नेत्यांची अमित शहांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra CM Oath Ceremony)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community