आता बंद दाराआड मोदी-मुख्यमंत्र्यांची चर्चा, नेमकं काय घडलं?

या दोन नेत्यांमध्ये तब्बल 30 मिनिटे चर्चा झाल्याने, आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मध्मुये ख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. मात्र या सगळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये तब्बल 30 मिनिटे चर्चा झाल्याने, आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

दरम्यान याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ‘होय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो असे सांगत, सत्तेत एकत्र नसलो म्हणून आमचे नाते तुटले असे होत नाही’, असे सांगितले. तसेच मी केवळ मोदींना भेटलो, नवाज शरीफ यांची भेट घेतली नसल्याचे म्हणत, त्यांनी जास्त बोलणे टाळले.

राज्यातल्या भाजप नेत्यांना दिले का संकेत?

राज्यात सध्या भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेला टार्गेट केले जात असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तबल अर्धातास बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे मी फक्त पंतप्रधान मोदींशी चर्चा करतो, असे संकेत राज्यातील भाजप नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले नाहीत ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

याआधी झालेल्या बंद दाराआडील चर्चेत काय झाले?

2019मध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप होत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. याचे कारण देताना, जे ठरलं आहे ते मिळायला हवे असे सांगत शिवसेनेने भाजपसोबत फारकत घेतली आणि राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने सरकार बनवले. या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला उत्तर दिले होते. आम्ही कुणालाही कसलेही आश्वासन दिले नव्हते, आम्ही वचन दिले हे सफेद झूठ आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेदरम्यान मी काही आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. मी कधीच बंद खोलीतले पॉलिटिक्स करत नाही, असे उत्तर अमित शहा यांनी शिवसेनेला दिले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here