राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या या झालेल्या दारूण पराभवावर केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारला आपले आमदार टिकवता आले नाही. त्यांच्यावर आमदारांचाही विश्वास राहिला नाही. सत्तेसाठी १४५ मते लागतात. त्यामुळे महा विकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, आणि बाजूला व्हावे, अशी मागणी नारायण राणेंनी केली आहे.
(हेही वाचा – …हा गोपनीयतेचा भंग नाही का? सोमय्यांचा निवडणूक आयोगाला सवाल)
तुम्ही सत्तेसाठी लायक नाही…
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांनी बोध घ्यावा. चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूसकीचा धर्म आहे. पवारांकडून माणूसकीचा धर्म घ्या. कोणाबद्दल तरी चांगलं म्हणा. तुमच्याकडून अपेक्षा नाही. कारण तुमचा स्वभाव मला माहित आहे. तुम्ही सत्तेसाठी लायक नाही असे म्हणणार नाही पण, तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी पात्र नाहीत, असे म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र सोडले.
तुमची विश्वासहार्यता आहे कुठे?
तीन सीट जिंकणार सांगत होते, काय झालं? राऊतही एका मताने आले. काठावर आले. वाचले आमच्या हातातून. आघाडीची मते त्यांना मिळायला हवी होती. ते सत्तेत आहेत. सत्तेसाठी १४५ मते लागतात. तुम्ही अल्पमतात आले आहात. तुम्ही राजीनामा द्या. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दहा वर्ष मागे नेला. तुमचे आठ आमदार फुटतात. तुमची विश्वासहार्यता आहे कुठे? तुमचे आमदार तुम्ही टिकवू शकत नाही आणि बढाया मारता. आमची मते पाहिली तर तुमच्यापेक्षा जास्त आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
Join Our WhatsApp Community