राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून, काँग्रेस सुद्धा या सरकारचा भाग आहे. मात्र, आता खुद्द सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठ फिरवणार असल्याची माहिती मिळत आहे. सोनिया गांधी यांनी भाजप विरोधी आघाडी भक्कम करण्यासाठी, ऑनलाईन बैठक बोलावली. मात्र, या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्री या बैठकीला हजेरी लावणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.
काय आहे बैठकीचे कारण?
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या घरी नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. सोनिया गांधींनी आता सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी ही बैठक होईल. उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी होतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले होते. मात्र सध्यातरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाही, अशी माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः पक्षवाढीसाठी युवासेना मैदानात, हा चेहरा ठरतोय लक्षवेधी)
भाजपने केली होती टीका
महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या संदर्भात ट्वीट करण्यात आलं आहे. ‘हमने पहलेही कहा था… सोनिया जिसकी मम्मी है, वो ठाकरे सरकार निकम्मी है।’, असं हे हिंदी भाषेतील ट्वीट आहे. हे नाकर्ते सरकार असून सोनिया गांधी ह्याच ठाकरे सरकारच्या ‘मातोश्री’ आहेत हे आम्ही आधीच सांगितलं होतं, असे ट्वीट करत भाजपने शिवसेनेवर टीका केली होती.
(हेही वाचाः ट्विटरवर निर्माण झाले अनेक राहुल गांधी… काय आहे कारण?)
Join Our WhatsApp Community