राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन ९ दिवस पूर्ण झाले असतांना देखील अद्याप सरकार स्थापन (Maharashtra CM) झालेले नाही. मुख्यमंत्री कोण होणार यावरून अनेक नावांची चर्चादेखील सुरू होती. तर मंत्री मंडळातील जागा वाटपावरून देखील तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापन कधी होणार व मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?
भाजपाचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) होणारे हे स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवीन मुख्यमंत्री असणार असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांचेच नाव फायनल झाल्याचे देखील सांगितले जातंय. पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून आज किंवा उद्या त्यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती होईल अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पीटीआयला दिली आहे. (Maharashtra CM)
STORY | Fadnavis’ name approved as Maharashtra CM; legislature party meeting in next two days: BJP leader
READ: https://t.co/5E1HxDAyrH pic.twitter.com/B7tpLUIAHi
— Press Trust of India (@PTI_News) December 1, 2024
नावाची घोषणा कधी होणार ?
आता भाजपा (BJP), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाला नेमकी कोणती मंत्रीपदे मिळतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अर्थ खाते हे अजित पवारांकडेच राहिल, अशी माहिती आहे. महायुतीच्या बैठकीत गृहमंत्रीपदासह सर्व मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील असे जवळपास निश्चित आहे. आज याबद्दलची घोषणा होऊ शकते. (Maharashtra CM)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community