महाराष्ट्र काँग्रेस हरियाणाच्या वाटेवर; Rahul Gandhi राज्यातील नेत्यांवर नाराज

112
महाराष्ट्र काँग्रेस हरियाणाच्या वाटेवर; Rahul Gandhi राज्यातील नेत्यांवर नाराज
  • प्रतिनिधी 

काँग्रेस हायकामांडला कुणाच्या मनमानीमुळे महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होण्याची भीती का वाटत आहे? काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शुक्रवारी निवडणूक समितीची बैठक मध्येच सोडून का निघून गेले?

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरायला जेमतेम चार दिवस उरले असले तरी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे. काँग्रेस आणि शिवसेना उबाठाच्या नेत्यांमध्ये बैठकांचे मॅरेथॉन सत्र सुरु आहे. एकाच दिवसात कितीतरी बैठका होत आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात कधी मातोश्रीवर जाताना दिसतात तर कधी शरद पवार यांच्या भेटीसाठी जाताना दिसतात.

(हेही वाचा – Aadhar Card ला ‘जन्म तारखेचा’ पुरावा मानण्यास Supreme Court चा नकार; ‘हा’ वैध दस्तऐवज मानला जाणार)

एवढे सगळे प्रयत्न करूनही आघाडीतील जागा वाटपाचे घोंगडे काही न्हाताना दिसत नाही. काल शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. यात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) कमालीचे नाराज झाले. ते बैठक मधातच सोडून निघून गेले.

उद्धव ठाकरे यांची उबाठा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागा वाटपाची चर्चा करण्यात महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते कमी पडले असल्याची खंत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बोलून दाखविली आहे. किती ओबीसी उमेदवारांना काँग्रेसकडून तिकीट देता येईल? किती जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत? असे प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील नेत्यावरची नाराजी व्यक्त केली.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : महापालिका शिक्षणाधिकारी निवडणूक रिंगणात; उबाठा शिवसेनेकडून ‘या’ मतदारसंघातून लढणार)

मुळात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वाडेट्टीवर आणि बाळासाहेब थोरात काँग्रेसकडून जागा वाटपाची चर्चा करीत आहेत. यातही प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले यांची जबाबदारी जास्त आहे. काँग्रेस नेत्यांनी जागा वाटपाची चर्चा बरोबर केली नाही. यामुळे, ज्या जागावर काँग्रेस विजयी होऊ शकते त्या जागा काँग्रेसने दुसऱ्या पक्षासाठी सोडल्या. ही बाब राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आवडली नाही.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार येईल असे वातावरण आहे. असेच वातावरण हरियाणाताही होते. मात्र, स्थानिक नेत्यांच्या महत्वाकाक्षेमुळे हरियाणात काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्रात सुद्धा नाना पटोले यांचा कारभार काँग्रेसला हानिकारक ठरु शकतो अशी भीती हायकामंडच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे हायकमांड अस्वस्थ झाले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.