शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली बैठक संपलेली आहे. शरद पवारांचं सध्याचं प्राधान्य म्हणजे हे सरकार पडण्यापासून वाचवणं. तुम्हाला असं वाटेल की शरद पवार उद्धव ठाकरेंसाठी एवढा आटापिटा करत असेल. पण असं मुळीच नाही. एकनाथरावांनी बंड करण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांची वक्तव्ये काढून पाहा. पुढच्या वेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल अशाप्रकारचं वक्तव्य ज्येष्ठ नेत्यांनी केलेलं आहे.
असं म्हटलं जातं की अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद शिवसेना आणि राष्ट्रवादीने वाटून घेतलं होतं. बंद खोलीत काय घडतं हे कुणीही सांगू शकत नाही. तरी राष्ट्रवादीचे काही दिवसांचे पूर्वीचे वक्यव्य बोलके आहे. ही आघाडी शरद पवारांच्या आग्रहामुळे आणि उद्धव ठाकरेंच्या महत्वाकांक्षेमुळे स्थापन झालेली आहे. कर्ता करविता शरद पवार आहेत.
एकनाथ शिंदेंचे बंड यशस्वी झाले तर ?
म्हणूनच हे सरकार वाचवणे हे पवारांचे पहिले प्राधान्य आहे. कारण त्याशिवाय त्यांच्या वारसदारांना मुख्यमंत्री होता येणार नाही. पंतप्रधान होण्याचे पवारांचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकत नाही. आता त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सुप्रियाताई सुळेंना बसवायचे आहे. एकनाथ शिंदेंचे बंड यशस्वी झाले तर पवार पराभूत झालेत असा अर्थ निघेल आणि पुढे कधीही सत्ता स्थापनेची संधी मिळणार नाही. कारण शिंदेंची शिवसेना आणि भाजपा बहुमताकडे सहज वाटचाल करेल हे पवारांना माहिती आहे.
( हेही वाचा : शिवसेनेत आता खासदारही नाराज?)
या खेळात उद्धव ठाकरेंनी तेव्हाच माघार घेतली जेव्हा त्यांनी वर्षा बंगला सोडला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा पवारांनी सांगितल्यामुळे दिलेला नाही असे दिसते आहे. पवारांना उद्धव ठाकरेंचं किंवा शिवसेनेचं काय होईल याची मुळीच चिंता नाही. त्यांना त्यांच्या वारसदारांचं काय होईल याची चिंता आहे. पण यामागे केवळ शिंदे किंवा फडणविस नसून राजकारणात ज्यांनी सर्वांना बाद केलं असे दिल्लीतील मोठे नेते असण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच सत्ता वाचवण्याची ही खेळी दिल्लीतील नेते आणि शरद पवार यांच्यामध्ये आहे.
जर या खेळीत शरद पवार जिंकले तर कदाचित त्यांच्या वारसदारांचे भवितव्य शाबूत राहणार आहे. पवार हरले तर हा त्यांचा सर्वात मोठा पराभव ठरणार आहे आणि त्यांच्या वारसदारांना चांगले मैदान उपलब्ध होणार नाही. ही राजकीय खेळी शरद पवार आपल्या कुटुंबासाठी खेळत आहेत. उद्धव ठाकरे या खेळीत भरडले जात आहेत आणि दुर्दैव म्हणजे याची कल्पना किंवा जाणीव मुख्यमंत्र्यांना नाही.
Join Our WhatsApp Community