राज्यात हिंसाचार घडवून आणण्यास ‘त्या’ ३६ पोस्ट कारणीभूत!

त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे भांडवल करत रझा अकादमीने राज्यातील विविध जिल्ह्यांत हिंसाचार घडवून आणला. त्यावेळी हा हिंसाचार अधिकाधिक वाढावा यासाठी सोशल मीडियातून प्रक्षोभक पोस्ट करण्यात आल्याचे महाराष्ट्र सायबर सेलच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्या पोस्ट कोणत्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे प्रसिद्ध झाल्या, याचा शोध पोलिस घेणार आहेत.

या विभागातून केल्या पोस्ट 

याप्रकरणी पोलिसांनी या पोस्ट ज्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या कंपन्यांना त्या पोस्ट हटवण्याची विनंती पोलिस करणार आहेत. मुंबई, अमरावती, कोल्हापूर, नांदेड, नाशिक या ठिकाणांवरून हा मजकूर समाजमाध्यमांवर टाकण्यात आल्याचे तांत्रिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस विभागांना कळण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

(हेही वााचा : रझा अकादमीच्या ‘त्या’ दंगलीचा हिशेब अजून बाकीच!)

अहवाल तयार 

महाराष्ट्र सायबर विभागाने केलेल्या तपासणीत ट्वीटरवर २५, फेसबुकवर सहा, इन्स्टाग्रामवर पाच प्रक्षोभक, चुकीच्या माहिती देणाऱ्या, धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर सापडले आहेत. याबाबत एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. आयपी अ‍ॅड्रेसच्या तपासणीत यातील बहुसंख्य मजकूर मुंबईतून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासणीत ३६ पैकी २५ मजकूर मुंबई पोलिसांच्या हद्दीतील असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्याशिवाय अमरावतीतून सात, कोल्हापूरमधून एक, नांदेडमधून एक, नाशिक ग्रामीणमधून एक व एक अनोळखी ठिकाणावरून असा एकूण ३६ मजकूर समाज माध्यमांवर टाकण्यात आला आहे.

दीड वर्षांत १० हजार आक्षेपार्ह पोस्ट 

गेल्या दीड वर्षांत १० हजार ७६ आक्षेपार्ह पोस्ट शोधल्या असून त्या हटवण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यातील चार हजार ९७७ मजकूर हटवण्यात आला आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे सात हजार १४५ मजकूर ट्वीटरवरील, ९३० मजकूर इन्स्टाग्रामवरील, १५९४ मजकूर फेसबुकवरील, २७४ यूटय़ुबवरील चित्रफिती, १०३ टिकटॉक व १९ इतर ठिकाणचा मजकूर आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here