राज्यपालांच्या पदमुक्तीबाबत फडणवीसांचे मोठे विधान! म्हणाले, तो निर्णय…

85

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात येत आहे. सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपले पद सोडण्यासाठी तयार असल्याची अफवा पसरल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याचबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तो अधिकार राष्ट्रपतींना

राज्याच्या राज्यपालांना नियुक्त करण्याचे आणि त्यांचा पदमुक्त करण्याचे सर्व अधिकार हे देशाच्या राष्ट्रपतींकडे असतात. त्यामुळे राज्य सरकार याबाबत काहीही करू शकत नाही. पण आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भावनांच्या पाठीशी आम्ही ठाम असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः भगतसिंग कोश्यारी राज्यपाल पद सोडणार नाही!)

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे प्रेरणास्त्रोत दुसरे कोणीही असू शकत नाहीत. राज्याचे आणि देशाचे आदर्श हे कायम छत्रपती शिवाजी महाराजच आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

ती बातमी अफवा

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाषणात शिवरायांचा उल्लेख केला, त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला आहे, त्यामुळे राज्यभर राज्यपालांच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे, अशा स्थितीत राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यपाल पदापासून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसारित होत होते, मात्र राजभवनाने याचे खंडन करण्यात आहे की, हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.