अजित पवार म्हणतात, एक महिना कठीण आहे, काळजी घ्या

89

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला राज्याच्या राजकारणात चांगलंच वजन आहे. त्यांच्या अनेक सूचक विधानांतून ते भविष्यात घडणा-या घटनांबाबत लोकांना सावध करत असतात. असंच एक विधान त्यांनी सोलापूरमधील एका कार्यक्रमात केले आहे. राज्यात सध्या उष्णतेची लाट पसरल्यामुळे पुढचा एक महिना कठीण आहे, त्यामुळे आपापली काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

काय म्हणाले पवार?

सोलापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. राज्यातील उष्णतेचा पारा हा दिवसेंदिवस वाढत आहे. चंद्रपूरला शुक्रवारी तापमान 45.5 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले. उजनीसह राज्यातील अनेक धरणांतील पाण्याची पातळी खाली जात आहे. चार-पाच दिवस अजूनही उष्णतेची लाट भारतात असणार आहे, असा अंदाज हवाामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढचा एक महिना कठीण आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचाः इंटरनेट बंद करण्यात भारत जगात टॉपर, एका वर्षात इतक्या वेळा झाले इंटरनेट ब्लॉक)

उगाचंच गाव भटकायचं कारण नाही

उन्हापासून वाचण्यासाठी सातत्याने पाणी पीत रहा. कारण नसताना उगाचंच गाव भटकायचं काही कारण नाही. नाहीतर काही लोकांना चल इकडं आणि चल तिकडं करण्याची सवय असते, तर तसं करू नका, अशी विनंतीही अजित पवार यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.