बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय खलबतं झाली, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीमुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत होती. स्वतः शरद पवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्यानंतर सुद्धा या भेटीबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
मोदी आणि पवार यांच्या भेटीबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून त्याला राजकीय वळण देण्यात येत आहे. या भेटीत देश आणि राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी मला सांगितले असे अजित पवार म्हणाले.
(हेही वाचाः ‘मातोश्री’नंतर ‘एम ताई’, ‘केबलमॅन’! यशवंत जाधवांच्या डायरीत दडलंय काय? )
आम्ही पवारांना फोन केला तेव्हा…
एखादी गोष्ट सांगताना आपल्याला कोणीही इत्तंभूत माहिती देत नाही. या भेटीची बातमी कळली तेव्हा मी आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कोपरगांव येथे होतो. त्यानंतर आम्ही शरद पवारांना फोन केला. जे महत्त्वाचे विषय होते त्याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा झाल्याचे पवारांनी आम्हाला त्यावेळी सांगितले. त्यामुळे मोदी-पवार भेटीवरील राजकीय चर्चांना आता अजित पवारांनी पूर्णविराम दिला आहे.
पवार साहेब बोलल्यानंतर…
काही जण जाणीवपूर्वक अशाप्रकारच्या बातम्यांचा विपर्यास करुन समाजात गैरसमज निर्माण करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे या सगळ्याला काही अर्थ नसल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एकदा पवार साहेब बोलल्यानंतर आम्ही छोट्या कार्यकर्त्यांनी त्याबाबत पुन्हा काही म्हणणं योग्य नसल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.
(हेही वाचाः ‘काका मला वाचवा अशा आर्त हाका दिल्लीत ऐकू आल्या’, मनसेचा पवारांना खोचक टोला!)
Join Our WhatsApp Community