‘जरा Sensible माणसाबद्दल विचारा’, फडणवीसांचा राऊतांना सणसणीत टोला

89

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात येत आहे. राऊतांच्या मागे ईडी चौकशीचा फेरा लागल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यावरुनच राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यालाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस माझ्यावर कितीही कारवाई करा तुमची सगळी कारस्थानं मला माहीत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी फडणवीसांवर केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला असता, फडणवीसांनी हसत-हसत राऊतांवर निशाणा साधला आहे.

त्यांनी पक्षाची अवस्था काय केली

संजय राऊत यांना आता तरी समज येणं गरजेचं आहे. त्यांनी पक्षाची अवस्था काय केली आहे ते सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे तुम्ही मला त्यांच्याबद्दल कशाला प्रश्न विचारता, त्यापेक्षा सेन्सिबल माणसाबद्दल विचारा, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

राऊतांचं ट्वीट

‘छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले’, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असे म्हणत पाटलांच्या विधानावर स्पष्टीकरण देत सावरलं. पण, ठीक ढंग से बोले गए झूठ को ही आज कल सत्य कहते है, असे म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.