‘65 मे से 50 निकल गए, अब बस दो ही बचे है’, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

167

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होत असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी शोले सिनेमातला डायलॉग मारत उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

कितने आदमी थे?

माझे शरीर हे अमजद खानसारखे आहे, पण तहीही कोणीतरी माझा उल्लेख अमिताभ बच्चन असा केला. पण तरी मी विचारू शकतो की, ‘कितने आदमी थे?, 65 मे से 50 निकल गए और सबकुछ बदल गया’, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः मुंबईत दहशतवादी हल्ल्याच्या धमकीबाबत मुंबई पोलिस आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया)

तुम्ही सोनियांपुढे नतमस्तक होण्यासाठी गेलात

आता त्यांच्याकडे फक्त दोनच उरले आहेत. त्यांचाही आम्ही सन्मान करतो. आम्ही विरोधकांचा नेहमीच सन्मान करत आलो आहोत, असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घरात बसणारे नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत. आमचे मुख्यमंत्री दिल्लीला जात असले तरी ते राज्याच्या विकासासाठी जात असतात. तुम्ही तिथे गेलात पण राज्यासाठी नाही तर सोनिया गांधींच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.