मागील काही महिन्यांपासून राज्यातील ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणांमध्ये (Maharashtra Drug Case) मोठ्या प्रमाणावर कारवाई होताना दिसत आहे. दरम्यान विरोधकांनी देखील हा मुद्दा उचलून धरला असून महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होत असल्याची टीका केली होती. मात्र ड्रग्ज प्रकरणी सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
(हेही वाचा – Sharad Pawar Birthday : “पवार साहेबांना सांगितलं की घरी बसा, आराम करा पण ऐकतच नाहीत, काय करणार?” – अजित पवार)
नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री ?
“ललित पाटील प्रकरणात (Maharashtra Drug Case) ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र आवश्यकता भासल्यास त्यांना अटक देखील केली जाईल. हा एक गंभीर विषय आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा संबंध आढळून आला तर त्याच्यावर निश्चितच कायदेशीर कारवाई केली जाईल. हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील षडयंत्र आहे. मागील काळात आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले ड्रग्ज (Maharashtra Drug Case) सापडले त्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे. मात्र आपल्याकडे देखील वेगवेगळ्या करखान्यांमध्ये ड्रग्ज तयार केले जात आहेत. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. राज्य सरकार या प्रकरणी गंभीर आहे. त्यामुळे आता ड्रग्ज प्रकरणी (Maharashtra Drug Case) सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही.”
ड्रग्ज हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांनी बैठक घेतल्यावर आता विविध राज्यात गुप्तचर माहितीची उत्तम देवाणघेवाण होते आहे.
ललित पाटील प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही.
4 पोलिस बडतर्फ तर 6 निलंबित करण्यात आले आहेत.
ड्रग्जमध्ये कुणी पोलिस संगनमत… pic.twitter.com/ExAOnkdEfC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2023
(हेही वाचा – Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजनेबाबत भूमिका बदलल्याची अजित पवारांची कबुली)
पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की; “ड्रग्ज (Maharashtra Drug Case) हा एक प्रकारचा हल्लाच आहे त्याला उत्तर दिलेच पाहिजे. हा आपल्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. आपण आताच यावर कठोर पाऊले उचलली नाही तर आपली पुढची पिढी बर्बाद होऊ शकते. डार्कनेटच्या माध्यमातून ड्रग्ज (Maharashtra Drug Case) विक्री केली जात आहे. त्यावरही पोलिसांचे लक्ष आहे असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community