राष्ट्रवादीकडील आधीची महत्त्वाची खाती फडणवीसांनी ठेवली आपल्या हाती  

103

शिवसेनेत उभी फूट पाडून सरकार शिंदे गटाला सोबत घेत भाजपाने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले आणि  सरकार स्थापन केले, त्यानंतर महिनाभराच्या कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि लगोलग खाते वाटपही झाले. मात्र या खाते वाटपावर नजर टाकली तर शिंदे गटाला जेवढी खाती देण्यात आली आहेत, त्या तुलनेत भाजपाने महत्वाची खाती स्वतःकडे ठेवल्याचे दिसत आहे. या प्रकरणी जरी उलटसुलट चर्चा सुरु झाली असली तरी या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे असले तरी सरकारमध्ये आमदार संख्या पाहता भाजपाचा या सरकारमध्ये वरचष्मा आहे आणि त्याचे नेतृत्व भाजपाकडे असणार आहे.

फडणवीसांनी सूचक संदेश दिला 

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे अर्थ, दिलीप वळसे पाटील यांचे गृह, जयंत पाटील यांचे जलसंपदा आणि जितेंद्र आव्हाड यांचे गृहनिर्माण खाते स्वतः:कडेच ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम खाती खाती दिल्याचा आरोप भाजपाने वारंवार केला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात बहुतांश मलईदार खाते भाजपाने आपल्याच नेत्यांकडे ठेवली आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची खाती आपल्याकडे ठेवून फडणवीसांनी सूचक संदेश दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद दिल्या कारणाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे तुलनेने महत्त्वाची खाती होती. पैकी राष्ट्रवादीकडे जनतेशी थेट संबंध असलेली खाती होती. गृह, अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण अशी खाती राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडे होती. ही खाती असल्याने संबंधित नेत्यांचा पर्यायाने थेट जनतेशी संबंध येईल. त्यामुळे लोकांच्या हिताचे निर्णय राबवतानाच पक्षविस्ताराचं धोरणही नेत्यांच्या पुढे असे. हीच खेळी आत्ता फडणवीसांनी खेळली आहे.

(हेही वाचा मेटेंचे अपघाती निधन; महामार्ग पोलिसांची ‘गोल्डन अवर्स’ संकल्पना कागदावर?)

भाजपाच्या कोणती खाती मिळाली?

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, आदिवासी विकास, ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, कामगार

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.